Category: महाराष्ट्र

Posted in महाराष्ट्र

कोरोनाचा महाराष्ट्रात एकही रुग्ण नाही; कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण केवळ अडीच टक्के – आरोग्यमंत्री

मुंबई

येथे कस्तुरबाराजावाडीकुर्लावांद्रेबाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केयर येथे विलगीकरण कक्षाची सुविधा करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये किमान दहा खाटांचे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत.कोरोनाच्या सर्दीतापखोकला या लक्षणांनुसार उपचार केले जात आहेत. त्याचबरोबर रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे. शिंकणेखोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थुंकीच्या वाटे या विषाणूचा प्रसार होतो. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक शिष्टाचार पाळणे आवश्यक असून खोकतांनाशिंकताना नाका तोंडावर रुमाल ठेवावाअसे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.केंद्र शासनाच्यावतीने डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येत असून 6 मार्चला त्याचे पहिले सत्र दिल्ली येथे होणार आहे. राज्यातील काहीडॉक्टर त्यात सहभागी होणार असून त्यांच्या माध्यमातून राज्यातील अन्य डॉक्टरांना प्रशिक्षित केले जाईल. राज्यात पर्सनल प्रोटेक्शन कीटएन-95 मास्कट्रीपल लेअर मास्क ही आवश्यक साधनसामुग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध असून त्याची कमतरता भासणार नाहीअसेही त्यांनी सांगितले.या विषाणूच्या प्रतिबंधासाठी नागरिकांची जाणीवजागृती करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेण्यात येत आहे. त्यामध्ये बॅनर्सपोस्टर्सहोर्डींगदृकश्राव्य माध्यमांवर जाहिरातीचित्रपटगृहांमधून संदेश प्रसारण आदी उपक्रम हाती घेण्यात येत आहे. सोशल मीडियातून अधिकृत संदेश पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासंदर्भात सध्या सोशल मीडियातून जो चुकीचा प्रचार केला जात आहे. तो रोखण्याकरिता सायबर क्राईमच्या अतिरिक्त महासंचालकांशी चर्चा करण्यात आली आहे. अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांसाठी यासंदर्भात प्रबोधनपर चर्चासत्र अधिवेशन संपण्यापूर्वी घेण्यात येईलअसे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी मास्क वापरण्याची गरज नाही. स्वच्छ धुतलेला रुमाल वापरुन प्रतिबंध होवू शकतो असे सांगतानाच हे मास्क रुग्णालयातील कर्मचारीबाधित रुग्ण व त्यांचे नातेवाईकांनी वापरावे. अशा मास्कची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. सध्या इराणमध्ये 1 हजार 200 विद्यार्थी आणि नागरिक अडकले असून त्यांना परत आणण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.कोरोनामुळे घाबरुन जाण्याची आवश्यकता नाहीअसे आश्वस्त करतानाचा सर्वांनी मिळून त्याचा मुकाबला करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.सुमारे तीन तास चाललेल्या चर्चेत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेविरोधी पक्षनेते प्रविण दरेकरसदसय् सर्वश्री शरद रणपिसेहेमंत टकलेमहादेव जानकरभाई जगतापप्रशांत परिचारकअनिकेत तटकरेडॉ.रणजित पाटीलभाई गिरकरविनायक मेटेजोगेंद्र कवाडेश्रीमती मनिषा कायंदेविद्या चव्हाणहुस्नबानो खलिफे आदींनी भाग घेतला.

Posted in महाराष्ट्र

लावंघर उपसा सिंचन योजनेस तत्वत: मान्यता – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

मुंबई

सातारा तालुक्यातील उरमोडी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत असलेल्या लावंघर उपसा सिंचन योजनेस तत्वत: मान्यता देण्यात आली असून त्याबाबत पुढील कार्यवाही करावीअसे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.विधानभवन येथे यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. यासंदर्भात संकल्पन व अंदाजपत्रक बाबत पुढील कार्यवाही करावीअसेही निर्देश देण्यात आले.लावंघर उपसा सिंचन योजनेसंदर्भात झालेल्या चर्चेत भूसंपादनन्यायालयीन अडीअडचणीपाण्याची आवश्यकता व बचत याबाबत सविस्तर चर्चा झाली. या प्रस्तावित लावंघर योजनेमध्ये लावंघरम्हसकरवाडीशिंदेवाडीकरंजेकरुन व आंबावडे या सहा गावांचा समावेश असून प्रस्तावित क्षेत्र 355 हेक्टर (आयसीए) इतके आहे.यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसलेमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलिल अन्सारी तसेच सातारा पाटबंधारे प्रकल्प अधीक्षक अभियंता बी.आर. पवार व इतर अधिकारी उपस्थित होते.

Posted in महाराष्ट्र

विधानपरिषद लक्षवेधी :

मुंबई

 अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत येणाऱ्या अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्त असलेल्या तांत्रिक पदांच्या अनुषंगाने उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेण्याची कार्यवाही सुरू आहे. समितीच्या मान्यतेनंतर पुढील अधिवेशनाच्या आत पदभरती करण्यात  येईलअसे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी विधानपरिषदेत सांगितले.सदस्य प्रा. अनिल सोले यांनी नागपूर येथील अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्त पदांविषयीची लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. शिंगणे बोलत होते. अन्न व औषध प्रशासनात विविध संवर्गात 1183 पदे मंजूर आहेत.  यात अन्न व औषध चाचणी प्रयोगशाळांतील एकूण 103 तांत्रिक पदांचा समावेश आहे. या पदांसाठी उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यानुसार समितीची मान्यता घेऊन पदभरती करण्यात येईल. अन्न चाचणी प्रयोगशाळा ही अन्न सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची प्रयोगशाळा आहे. त्यामुळे या प्रयोगशाळांचे सक्षमीकरण करण्यात  येईल. सद्यस्थितीत नागपूरमुंबई आणि औरंगाबाद येथे अन्न चाचणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. येत्या काळात नाशिकपुणे येथेही अन्न चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात येईलअसे श्री. शिंगणे यांनी विधानपरिषदेत सांगितले.लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य सर्वश्री रामदास आंबटकरनागो गाणारअंबादास दानवेगिरीश व्यास यांनी भागसारथीप्रकरणी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती  बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवारराज्यातील मराठामराठा-कुणबी व कुणबी-मराठा यांच्या सामाजिकआर्थिक व शैक्षणिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल येत्या दहा दिवसात येणार असून अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईलअसे बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत सांगितले.सदस्य सतिश चव्हाण यांनी सारथी संस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री.वडेट्टीवार बोलत होते. राज्यातील मराठामराठा-कुणबी व कुणबी-मराठा यांच्या सामाजिकआर्थिक व शैक्षणिक विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधनप्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेची स्वायत्तता कायम ठेवण्यात येणार आहे. पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात या संस्थेसाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात येईलअसे श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.सारथी गैरव्यवहारप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने पुणे येथील सारथीच्या मुख्यालयात जाऊन या प्रकरणाची चैाकशी केली. त्यानंतर या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी श्री. कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित करण्यात आली आहे. सारथी अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीविद्यावेतनाचे पैसे थकित असल्यास ते येत्या 15 दिवसाच्या आत दिले जातीलअसे श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य सर्वश्री महादेव जानकरभाई गिरकरसुरेश धस यांनी          मुंबईतील जे.जे. रुग्णालयात कर्करोग उपचार केंद्र सुरू करणार  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमितदेशमुखमुंबईत कर्करोग रुग्णांची उपचाराची गरज लक्षात घेता येत्या काळात मुंबईतील जे.जे. रुग्णालयात कर्करोग उपचार केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले.सदस्य जोगेंद्र कवाडे यांनी विधानपरिषदेत मुंबईतील जे.जे. रुग्णालयातील सोई-सुविधांविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. देशमुख बोलत होते. मुंबईतील जे.जे. रुग्णालयाला लवकरच दिडशे वर्ष पूर्ण होणार आहे. विविध कार्यक्रमाचे आयोजन यानिमित्त करण्यात येणार आहे. यादरम्यान जे.जे. रुग्णालयात कर्करोग उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जे.जे. रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभाग कार्यरत असून या संस्थेत कुठल्याही हृदय शस्त्रक्रिया बंद पडलेल्या नाहीत. अपुऱ्या औषध पुरवठ्याअभावीही कोणत्याही शस्त्रक्रिया बंद पडलेल्या नसून रुग्णसेवा अखंडित सुरू असल्याचे श्री.देशमुख यांनी  यावेळी सांगितले.विधिमंडळ सदस्यांसाठी औषधोपचाराची एक योजना यापूर्वी अस्तित्वात होती. ती सध्या स्थगित आहे. मात्रकेवळ विधानसभा आणि विधानपरिषदच नव्हे तर लोकसभा आणि राज्यसभेच्या राज्यातील सदस्यांसाठी एक वेगळी योजना आणण्यासंदर्भात धोरण आखण्यात येईलअसे श्री.देशमुख यांनी या लक्षवेधीवरील एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य विक्रम काळेभाई गिरकरअमरनाथ राजूरकरअनंतराव गाडगीळडॉ.परिणय फुके यांनी भाग घेतला.

Posted in महाराष्ट्र

दिव्यांगांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्या- शरद बोबडे

नागपूर

दिव्यांगांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण करतानाच त्याचे पुढील जीवन सुसह्य करण्यासाठी सामाजिक संस्थांनी मानवतेचा दृष्टिकोन ठेवून कार्य करावे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आज येथे केले.
भगवान महावीर विकलांग सहायता समिती, जयपूर व महावीर इंटरनँशनल सर्व्हीस ट्रस्ट नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार निवास परिसरात विदर्भातील दिव्यांगांसाठी विविध उपकरणांच्या वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.व्यासपीठावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी, न्या. रवी देशपांडे, न्या. एस. बी. शुक्रे, ओडिशाचे लोकायुक्त अजित सिंग, यांच्यासह भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे डी. आर. मेहता उपस्थित होते.समाजाने मानवी मूल्यांचे संवर्धन करावे. त्याचे सेलिब्रेशन करावे. समाजात वावरताना उत्कट मानवी संवेदनाची जपवणूक करण्याची गरज असून, दिव्यांगांप्रती मानवी दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे डी. आर. मेहता यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. दिव्यांगांनी समाजात चार प्रकारचे आत्मसन्मान गमावेलेले असतात. तो आत्मसन्मान दिव्यांगांना कृत्रिम अवयवांतून मिळवून दिल्यामुळे ते समाजात ताठ मानेने जगतात व आत्मनिर्भर बनतात. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे हास्य आत्मसमाधान मिळवून देत असल्याचे डी. आर. मेहता यांनी सांगितले. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान जगण्याची नवी प्रेरणा देत असून, महात्मा गांधी यांच्या ‘…. पीड पराई जाने रे’ या भजनानुसार जीवनात प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डी. आर. मेहता यांनी भगवान महावीर विकलांग सहायता समितीकडून दरवर्षी करण्यात येत असलेल्या समाजोपयोगी कामाबाबतची माहिती दिली. तसेच दिव्यांगांच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी समाजाने सढळ हाताने दान करुन दिव्यांगांना सहकार्य करताना मानवता, बंधुभाव वाढीस लावण्याचे आवाहन केले.
दिव्यांगांना वाटप केलेल्या उपकरणांबाबत न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आयोजकांचे कौतुक केले. तसेच या कार्यक्रमातील आनंद जगावेगळा असल्याचे सांगत जे निर्मात्याने दिले नाही ते डी. आर. मेहता यांनी दिव्यांगांना मिळवून दिले असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते दिव्यांगासाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
विधी सेवा प्राधिकरण दिव्यांग, दुर्बल घटकांचे आयुष्य सहज, सुकर आणि सुलभ व्हावे यासाठी कार्यरत आहे. यावेळी साडेतीन हजार दिव्यांगांना तीनचाकी सायकल, व्हीलचेअर, कृत्रिम अंग, जयपूर फूट, कृत्रिम हात, कँलिपर्स, बैसाखी, शूज, बेल्ट, बीटी कान मशीन, काठीचे मोफत वितरण करण्यात आले. डॅनी, बळीराम, जितेंद्र, इच्छा आदिंना प्रातनिधीक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते कृत्रिम उपकरणांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांचीही उपस्थितीही होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मूक-बधीर शाळेतील विद्यार्थ्यानी ‘ऐ मेरे वतन के लोगो व मेरा मुल्क मेरा देश, मेरा ये वतन’ गीतावर अभिनय सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्वरी जोशी यांनी केले. तर भरत पारेख यांनी आभार मानले.

Posted in महाराष्ट्र

शहर विकासासाठी निधी कमी पडणार नाही- पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर

करवीर काशीचा विकास होण्याच्या दृष्टीने महिनाभरात 22 कोटी 50 लाखाचा जिल्हा नियोजनमधून तर 25 कोटी ठोक अनुदान म्हणून वित्त मंत्र्यांनी दिला आहे. यापुढेही शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी दिली. श्री क्षेत्र महालक्ष्मी (करवीर निवासिनी अंबाबाई) मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत बहुमजली वाहनतळ इमारत बांधण्याचा भूमिपूजन सोहळा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आज झाला. यावेळी महापौर निलोफर आजरेकर उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आमदार चंद्रकांत जाधव, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्याची सुरुवात आजच्या भूमिपूजन सोहळ्याने होत आहे. या बहुमजली वाहनतळामुळे शहरात येणाऱ्या भाविकांसाठी, पर्यटकांसाठी मोठी सोय होणार आहे. पहिला टप्पा म्हणून निधी दिला असला तरी उर्वरित राहिलेलं काम ही आम्हीच करणार आहोत त्यासाठीही निधी देण्याची आमची भुमिका राहील. नगरोत्थान मधून सिग्लनसाठी दीड कोटी, बल्ड सेपरेशन युनिटसाठी दीड कोटी, दलित वस्ती प्रभागासाठी आकरा कोटी, पुरग्रस्तांसाठी तीन कोटी असा जिल्हा नियोजनमधून 22 कोटी 50 लाखाचा निधी दिला आहे. वित्तमंत्री अजित पवार यांनीही ठोक अनुदान म्हणून 25 कोटीचा निधी महापालिकेला दिला आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. शहराच्या विकासाला निधी कमी पडणार नाही त्यासाठी आम्ही प्रयत्नशिल राहू. मात्र तुम्हा सर्वांची साथ विकास कामाला हवी, असेही ते म्हणाले. श्री. मुश्रीफ म्हणाले, बहुमजली वाहनतळामुळे मोठा प्रश्न निकालात निघणार आहे. किमान 500 वाहनांची सोय या ठिकाणी व्हावी. आपल्या विभागाचा विकास झाला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशिल आहोत.  शहरातील रस्त्यांसाठी 178 कोटीचा रस्ते बांधणीच्या प्रकल्पास लवकरच मंजुरी दिली जाईल. विकासाभिमुख शहर करु. दर्जेदार कामं होणं ही लोकांची अपेक्षा आहे. चांगली विकासात्मक कामं करा, दर्शन मंडपाचा मार्गही मोकळा करु, असे आश्वासन ही त्यांनी दिले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. जाधव, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. जाधव, आमदार श्री. जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला महापौर श्रीमती आजरेकर यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. यावेळी स्थायी समितीचे सभापती संदीप कवाळे,  प्राथमिक शिक्षण समिती सभापती श्रावण फडतारे, परिवहन समिती सभापती  प्रतिज्ञा उत्तुरे, विरोधी पक्षनेता विजय सूर्यवंशी, प्रभाग समिती सभापती.हसिना फरास, गटनेता शारगंधर देशमुख, अजित ठाणेकर, राहुल चव्हाण, स्थानिक नगरसेवक शेखर कुसाळे, अशोक जाधव, प्रतापसिंह जाधव, अर्जुन माने, तौफिक मुल्लानी, सुभाष बुचडे, सचिन पाटील, नियाज खान, लाला भोसले, आशिष ढवळे, नगरसेविका .माधुरी लाड, वहिदा सौदागर, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उप-शहर अभियंता रावसाहेब चव्हाण, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, कनिष्ठ अभियंता अरुण गवळी, ठेकेदार व्ही.के.पाटील व नागरिक आदी उपस्थित होते.

Posted in महाराष्ट्र

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या; अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भंडारा येथे राईस मिलला भेट

भंडारा

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज धान खरेदी केंद्र व राईस मिलला भेट देऊन धान उत्पादक शेतकरी व मिलरच्या समस्या जाणून घेतल्या. धान खरेदी केंद्रावर येणारे सर्व धान खरेदी केले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.आज खराबी आणि सौंदड येथील राईस मिलला छगन भुजबळ यांनी भेट देऊन मिलींगची पाहणी केली.यावेळी उपस्थित शेतकरी आणि मिलर यांनी श्री.भुजबळ यांना धान शेती आणि राईस मिलिंगबाबत माहिती दिली.यावेळी आ राजू कारेमोरे आणि आ मनोहर चंद्रिकापुरे यांच्यासह पुरवठा उपायुक्त रमेश आडे, जिल्हा पुरवठा अधिकारी बनसोड, जिल्हा पणन अधिकारी खाडे यावेळी उपस्थित होते.यावेळी भुजबळ म्हणाले की, सर्वसाधारण धानाला १८१५ रुपये आणि उच्चप्रतीच्या धानाला १८३५ रुपये दर होता. गेल्या कित्येक वर्षापासून धान उत्पादक शेतकऱ्यांची बोनसची आणि दरवाढीची मागणी होती. महाविकास आघाडी सरकारने धानाला ५०० रुपये बोनस जाहीर केला. त्या पाठोपाठ नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आणखी २०० रुपयांची दरवाढ देण्यात आली. त्यामुळे धानाचे भाव जवळपास २५३५ रुपयांच्या घरात पोहचले आहे. याचा धान उप्तादक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूर आदी जिल्ह्यांमधील धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी भंडारा येथे ही प्रातिनिधिक भेट दिल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले.त्याचप्रमाणे धान वाहतुकीची परवानगी ५०० किलोमीटर वरून ८०० किलोमीटर करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. कोकण विभाग सोडून राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांचा वाहतुकीमध्ये समावेश करण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाले.आलेल्या नागरिकांशी त्यांनी यावेळी संवाद साधला. शिवभोजन योजनेच्या जेवणाचा दर्जा उत्तम असल्याची प्रतिक्रिया यावेळी लाभार्थ्यांनी व्यक्त केली. स्वच्छता राखा, फलक दर्शनी भागात लावा, जेवणाचा दर्जा उत्तम ठेवा अशा सूचना भुजबळ यांनी केल्या. शिवभोजनामुळे गरजू व गरीब जनता समाधानी असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.

Posted in महाराष्ट्र

शासन संवादात नव माध्यमांची भूमिका महत्त्वाची – माहिती उपसंचालक दयानंद कांबळे

नाशिक  अधिकृत माहिती जनतेपर्यंत वेगाने पोहोचण्याचे सामर्थ्य नव माध्यमात असल्याने शासन संवादात नव माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राचे माहिती उपसंचालक दयानंद कांबळे यांनी केले.केटीएचएम महाविद्यालय अंतर्गत बी.व्होक मास मीडिया आयोजित ‘नव माध्यमांचा समाजावर होणारा परिणाम’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. औरंगाबाद विभाग माहिती संचालक गणेश रामदासी, विभागप्रमुख प्रा. विशाखा ठाकरे आदी उपस्थित होते.श्री.कांबळे म्हणाले, नव माध्यमांचा वेगाने प्रसार होत आहे. ट्टिटर, फेसबूक, व्हॉट्सॲप, हॅलो अशा अनेक माध्यमातून माहिती प्रसार वेगाने होत आहे. मात्र या माध्यमातून अफवा, चुकीचे संदेश, फेक न्यूज ओळखणे कठीण आहे. त्यासाठीची यंत्रणा भारताच नुकतीच आकार घेऊ लागली आहे. मजकुरातील वस्तुनिष्ठता ओळखणारी यंत्रणा तयार झाल्यास त्याआधारे शासन यंत्रणेलादेखील धोरणे ठरविताना मार्गदर्शन होऊ शकेल.केंद्र आणि राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात नव माध्यमांचा उपयोग सुरू केला आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे अधिकृत ट्विटर हँडल सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून शासनाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवत असताना जनतेच्या प्रतिक्रियांची दखलदेखील विविध स्तरावर घेण्यात येत आहे.नव माध्यमातून एखाद्या विषय किंवा घटनेची माहिती तात्काळ प्राप्त होत असल्याने निर्णय प्रक्रियेत त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. त्यामुळे या माध्यमाविषयी साक्षरता वाढविणे गरजेचे आहे. जनतेने सजगपणे नव माध्यमाचा उपयोग केल्यास शासनाला धोरणे ठरविताना नागरिकांनी नव माध्यमातून व्यकत केलेल्या मतांचा उपयोग होऊ शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.माध्यम क्षेत्रात मजकूर तयार करण्याचे कौशल्य असलेल्या युवकांना चांगली संधी आहे. नव माध्यमांचा वाढता उपयोग लक्षात घेता या क्षेत्रात रोजगारांच्या संधीदेखील मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याचेही ते म्हणाले. नव माध्यमकर्त्यांच्या सकारात्मक भूमिकेवर समाजातील अनुकूल बदल अवलंबून असतात, असे मतही त्यांनी व्यक्त केले.श्री.रामदासी म्हणाले, माध्यमांच्यादृष्टीने मजकुराला (कटेंन्ट) महत्त्व असल्याने त्यासाठी वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. नव माध्यमांमध्ये व्यक्त होताना नाविन्य आणि  निरीक्षण क्षमतेला महत्व आहे. सभोवतालचे बारकावे टिपण्याची सवय असल्यास नव माध्यमांसाठी चांगला मजकूर देता येईल. या माध्यमांमधून येणाऱ्या माहितीतील अनावश्यक व चुकीची माहिती बाजूला सारून इतर बाबींचा आवश्यकतेनुसार उपयोग करण्याचे कौशल्यदेखील तेवढेच महत्वाचे आहे. माध्यम क्षेत्रात वेगाने होणाऱ्या बदलांकडे विद्यार्थ्यांनी बारकाईने लक्ष द्यावे व त्याविषयीचे  ज्ञान आणि संवाद कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

Posted in महाराष्ट्र

जिल्ह्यातील ५० हजार ६१८ शेतकऱ्यांच्या याद्या २८ पर्यंत उपलब्ध होतील – जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर 

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील आसुर्ले येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील 50 हजार 618 पात्र शेतकऱ्यांच्या याद्या 28 फेब्रुवारी 2020 पर्यंत उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा जिल्ह्यतील पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले आणि हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथील थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करून करण्यात आला. आसुर्ले येथील भैरव विकास सोसायटीमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमास प्रातांधिकारी अमित माळी, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, तहसिलदार रमेश शेंडगे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए.बी. माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आज जिल्ह्यात आसुर्ले आणि हेर्ले येथील आधार प्रमाणिकरण कामाची पथदर्शी योजना हाती घेतली असून या दोन गावातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या पूर्ण झाल्या असून त्यांच्या आधार प्रमाणिकरणाच्या कामाचा शुभारंभ आज झाला. आसुर्ले येथील 116 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणिकरण केले जाणार आहे. या याद्यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यांची त्या-त्या स्तरावर निर्गती केली जाईल, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आधार प्रमाणिकरणाच्या कामाची पाहणी केली तसेच आधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकऱ्यांना पोच पावत्यांचे वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्ह्यातील 50 हजार 618 शेतकऱ्यांच्या याद्या 28 पर्यंत उपलब्ध होतील – जिल्हाधिकारीमहात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट करून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, या योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी प्रशासन सतर्क असून जिल्ह्यातील 50 हजार 618 थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास 372 कोटी रूपयांची कर्जमाफी होवून हे शेतकरी कर्जमुक्त होतील. या सर्व शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली असून 28 तारखेपर्यंत याद्या उपलब्ध होतील.जिल्हा उपनिंबधक अमर शिंदे यांनी या योजनेची सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यात आज कर्जमुक्ती योजनेतंर्गत आसुर्ले आणि हेर्ले येथे पात्र थकबाकीदार शेतकरी सभासदांच्या आधार प्रमाणिकरणाच्या कामाचा पथदर्शी योजना शासनाने हाती घेतली असून जिल्ह्यातील उर्वरित पात्र थकबाकीदार शेतकरी सभासदांच्या याद्या 28 पर्यंत उपलब्ध केल्या जातील. या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, विकास सोसायटी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखेत लावल्या जातील, असेही ते म्हणाले.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनीही या याजेनेबद्दल समाधान व्यक्त करून आसुर्ले गावात या योजनेंतर्गत आधार प्रमाणिकरणाचा शुभारंभ केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मी कर्जमुक्त होणार – शेतकरी बाबासो जाधवमहात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे माझे 1 लाख 25 हजार 312 रूपयांचे कर्ज माफ होऊन मी कर्जमुक्त होणार असल्याचे समाधान आसुर्ले येथील शेतकरी बाबासो बापू जाधव यांनी आधार प्रमाणीकरणानंतर व्यक्त केले. यंदाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे भैरवनाथ विकास सोसायटीकडील 1 लाख 25 हजार 312 रूपयांच्या कर्जाची परतफेड करणे अशक्य झाले असताना शासनाच्या या कर्जमुक्ती योजनेमुळे मी कर्जमुक्त झालो हे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी सर्वात आनंदाचा क्षण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.कर्जमुक्तीबद्दल शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधानआसुर्ले येथील खंडू बंडू पाटील यांनीही आपले 34 हजार 500 रूपयांचे थकीत कर्ज माफ होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त करून शासनाचे आभार मानले तसेच थकीत शेतकरी सभासद रेखा कुंडलिक दुगुले यांचे केदारलिंग विकास सोसायटीकडील 75 हजार रूपयांचे थकीत कर्ज माफ होणार असल्याबद्दल त्यांनीही आनंद व्यक्त करून शासनास धन्यवाद दिले.आसुर्ले गावचे सरपंच भगवान पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. भैरवनाथ विकास सोसायटीचे चेअरमन संपतराव पाटील यांनी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आसुर्ले येथील या योजनेंतर्गत पात्र ठरणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जाबाबतची माहिती दिली.समारंभास सहायक निबंधक शिरीष तळकेरी, उपसरपंच संभाजी पाटील, विकास सोसायटीचे सचिव अशोक जाधव यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Posted in महाराष्ट्र

वीटभट्टी मजूरांच्या मुलांच्या आरोग्य व शिक्षणासाठी कृती आराखडा – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

अमरावती

वीटभट्टी मजुरांच्या मुलांच्या आरोग्य व शिक्षणाच्या प्रश्नाबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तत्काळ कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश शालेय शिक्षण, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज येथे दिले.वीटभट्टी मजुरांच्या मुलांचे आरोग्य व शिक्षण याबाबत उपाययोजनांबाबत बैठक बडनेऱ्याजवळ वीटभट्टी परिसरातील बंडेश्वर भद्रा हनुमान मंदिरात झाली, त्यावेळी ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष काकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्यामसुंदर निकम, माध्यमिक शिक्षणाधिकारी नीलिमा टाके, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांच्यासह वीटभट्टी व्यावसायिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, अनेक मान्यवर आदी यावेळी उपस्थित होते.राज्यमंत्री श्री.कडू म्हणाले की, उन्हातान्हात राबणाऱ्या वीटभट्टी मजुरांचे आयुष्य कष्टप्रद असते. त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, त्याचप्रमाणे, त्यांच्या मुलांच्या आरोग्य व शिक्षणाचीही आबाळ होते. त्यामुळे  हा प्रश्न प्राधान्याने सोडविणे आवश्यक आहे. त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून कृती आराखडा तयार करण्यात यावा. वीटभट्टी कामगार, लहान मुले, स्तनदा माता यांच्यासाठी आवश्यक त्या योजना व सुविधांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी मिशनमोडवर आराखडा तयार करावा.बडनेरा ते अंजनगाव बारी परिसरात सुमारे 80 वीटभट्ट्या असून, तीनशे ते साडेतीनशे कामगार आहेत. साधारणत: ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मजूर कामासाठी कुटुंबासह येतात. त्यामुळे त्यांच्या मुलांचे शिक्षण खुंटते व आरोग्याकडेही दुर्लक्ष होते. त्यादृष्टीने कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यासाठी कामगार विभागाने सर्व कामगारांची नोंदणी करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा. वीटभट्टी व्यवसाय परिसराचा नकाशा तयार करून त्यात परिसरनिहाय आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कृती आराखडा करावा, असे निर्देश राज्यमंत्री श्री.कडू यांनी दिले.मुलांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी या परिसरात आरोग्य तपासणी नियमितपणे व्हावी. आवश्यक तिथे शिबिरे घ्यावीत. मुलांच्या तपासणीदरम्यान पालक उपस्थित असावेत जेणेकरून गोळ्या-औषधे कधी व कसे घ्यायचे याबाबत जाणून घेऊ शकतील. अंगणवाड्यांतून आहार दिला जातो, तशी फिरती पोषण आहार व्यवस्था सुरू करण्यात यावी. वीटभट्टीवर कामगार आईवडील दोघेही काम करत असल्याने लहानग्या बाळाचा सांभाळ करण्याची जबाबदारी मोठ्या भावंडाकडे दिली जाते. त्यामुळे अशा मुलांना शाळेत पाठविण्यास आईवडील अनुत्सुक असतात. त्यामुळे या परिसरात पाळणाघर असणे आवश्यक आहे. राजीव गांधी पाळणाघर योजनेत स्वयंसेवी संस्थेमार्फत पाळणाघर तत्काळ सुरु करण्यात यावे. आवश्यक बाबींसाठी फंड उभारण्यात येईल. या उपक्रमासाठी वीटभट्टीमालक, अधिकारी, कर्मचारी यांनी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. येथील मुलांना शाळेत नेणे-आणण्यासाठी लागणाऱ्या वाहन खर्चाबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी शिक्षण प्रशासनाला दिले. यावेळी राज्यमंत्री श्री.कडू यांनी वीटभट्ट्यांना भेट देऊन तेथील मजुरांशी व बालकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

????????????????????????????????????
Posted in महाराष्ट्र

गावखेड्यात समृद्धीचे वातावरण निर्माण करण्यास कटिबध्द – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ

नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे काम आहे. सार्वजनिक विकासापेक्षा प्रत्येक कुटुंब आनंदी व गावात समृद्धी असेल तर तो खरा विकास आहे. असा विकास करणे हे आपले स्वप्न आहे. त्यामुळे प्रत्येक गावखेड्यात समृद्धीचे वातावरण निर्माण करण्यास आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.दारव्हा तालुक्यातील चोरखोपडी येथे सिंचन तलावाच्या विशेष दुरुस्ती कामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष कालिंदा पवार, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, दारव्हा पंचायत समिती सभापती सुनिता राऊत, उपसभापती नामदेव जाधव, जि.प. सदस्या आश्विनी कुरसंगे, पं.स.सदस्या सविता जाधव, चोरखोपडीच्या सरपंच गिता जाधव, उपसरपंच गजानन जवके, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सुरज शिंदे आदी उपस्थित होते.सिंचन तलावाच्या कामाची दुरुस्ती योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे, असे सांगून श्री. राठोड म्हणाले, अभियंत्यांनी कामाचे डिझाईन व अंदाजपत्रक दाखवावे. गावकऱ्यांनी केलेल्या सत्कारामुळे आपण भारावून गेलो आहोत. गावकऱ्यांचा मी सदैव ऋणी राहील. साधा आमदार ते कॅबिनेट मंत्रिपद हे केवळ गावकऱ्यांच्या आशीर्वादामुळेच शक्य झाले आहे. त्यामुळे आता बोलण्यापेक्षा विकासाच्या कृतीवर आपला भर राहील. गावखेड्यातील प्रत्येक कुटुंबात आनंद व समृद्धीचे वातावरण निर्माण करणे, हेच आपले ध्येय आहे. युवकांच्या हाताला काम, महिलांना प्रोत्साहन, चांगले आरोग्य, दर्जेदार शिक्षण, सिंचन व्यवस्था, बेरोजगारीवर मात यासारख्या विकासाच्या गोष्टी मार्गी लावायच्या आहेत, असे ते म्हणाले. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने पालकमंत्री संजय राठोड यांची लाडूतुला करण्यात आली.चोरखोपडी सिंचन तलावाचे काम जि.प. सिंचन विभागाने रोजगार हमी योजनेतून सन 1985-86 मध्ये पूर्ण केले. 16 ऑगस्ट 2018 रोजी दारव्हा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (45 मिनिटांत 132 मिमी.) धरणाच्या बुडीत क्षेत्रातील पाणीपातळी धरणाच्या माथा पातळीपर्यंत गेली होती. त्याअनुषंगाने धरणाची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 49.98 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चोरखोपडी येथील सिंचन तलावाच्या धरण भिंतीची लांबी 220 मीटर असून महत्तम उंची 13.70 मीटर आहे. या धरणांतर्गत सिंचनाचे क्षेत्र 70 हेक्टर आहे.