कोरोनाचा महाराष्ट्रात एकही रुग्ण नाही; कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण केवळ अडीच टक्के – आरोग्यमंत्री

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

मुंबई

येथे कस्तुरबाराजावाडीकुर्लावांद्रेबाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केयर येथे विलगीकरण कक्षाची सुविधा करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये किमान दहा खाटांचे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत.कोरोनाच्या सर्दीतापखोकला या लक्षणांनुसार उपचार केले जात आहेत. त्याचबरोबर रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे. शिंकणेखोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थुंकीच्या वाटे या विषाणूचा प्रसार होतो. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक शिष्टाचार पाळणे आवश्यक असून खोकतांनाशिंकताना नाका तोंडावर रुमाल ठेवावाअसे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.केंद्र शासनाच्यावतीने डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येत असून 6 मार्चला त्याचे पहिले सत्र दिल्ली येथे होणार आहे. राज्यातील काहीडॉक्टर त्यात सहभागी होणार असून त्यांच्या माध्यमातून राज्यातील अन्य डॉक्टरांना प्रशिक्षित केले जाईल. राज्यात पर्सनल प्रोटेक्शन कीटएन-95 मास्कट्रीपल लेअर मास्क ही आवश्यक साधनसामुग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध असून त्याची कमतरता भासणार नाहीअसेही त्यांनी सांगितले.या विषाणूच्या प्रतिबंधासाठी नागरिकांची जाणीवजागृती करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेण्यात येत आहे. त्यामध्ये बॅनर्सपोस्टर्सहोर्डींगदृकश्राव्य माध्यमांवर जाहिरातीचित्रपटगृहांमधून संदेश प्रसारण आदी उपक्रम हाती घेण्यात येत आहे. सोशल मीडियातून अधिकृत संदेश पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासंदर्भात सध्या सोशल मीडियातून जो चुकीचा प्रचार केला जात आहे. तो रोखण्याकरिता सायबर क्राईमच्या अतिरिक्त महासंचालकांशी चर्चा करण्यात आली आहे. अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांसाठी यासंदर्भात प्रबोधनपर चर्चासत्र अधिवेशन संपण्यापूर्वी घेण्यात येईलअसे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी मास्क वापरण्याची गरज नाही. स्वच्छ धुतलेला रुमाल वापरुन प्रतिबंध होवू शकतो असे सांगतानाच हे मास्क रुग्णालयातील कर्मचारीबाधित रुग्ण व त्यांचे नातेवाईकांनी वापरावे. अशा मास्कची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. सध्या इराणमध्ये 1 हजार 200 विद्यार्थी आणि नागरिक अडकले असून त्यांना परत आणण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.कोरोनामुळे घाबरुन जाण्याची आवश्यकता नाहीअसे आश्वस्त करतानाचा सर्वांनी मिळून त्याचा मुकाबला करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.सुमारे तीन तास चाललेल्या चर्चेत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेविरोधी पक्षनेते प्रविण दरेकरसदसय् सर्वश्री शरद रणपिसेहेमंत टकलेमहादेव जानकरभाई जगतापप्रशांत परिचारकअनिकेत तटकरेडॉ.रणजित पाटीलभाई गिरकरविनायक मेटेजोगेंद्र कवाडेश्रीमती मनिषा कायंदेविद्या चव्हाणहुस्नबानो खलिफे आदींनी भाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *